मनोरमा को ऑप बँक लि सोलापूर - Manorama Coop Bank Ltd Solapur
top of page
White Background

Celebrating 27 Years of Relationship

Thank you,Shareholders,Customers & well wishers for your unsifted support our Journey  

ग्राहकांच्या ठेव सुरक्षेला प्राधान्य हेच मनोरमा बँकेचे ध्येय’

WELCOME

Other Links

मनोरमाचे पाऊल पडते पुढे’. 

ग्राहकांच्या ठेव सुरक्षेला प्राधान्य हेच मनोरमा बँकेचे ध्येय’

  संस्थापक अध्यक्ष -  क़ै. सदाशिव रामचंद्र मोरे (दाजी)

 मार्गदर्शक चेअरमन – श्री.श्रीकांत मोरे 

 मनोरमा सखी मंच. अध्यक्ष - सौ.शोभा श्रीकांत 

                          मनोरमा परिवाराच्या सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, आर्थिक क्षेत्रातील कामकाजामुळे मनोरमा परिवाराने सोलापूर जिल्हा तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.  ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात मनोरमा बँकेचा मिश्र व्यवसाय ९०५ कोटी रुपयाचा टप्पा पार केला आहे.मनोरमा बँकेच्या एकूण ७ शाखा कार्यरत आहेत. पंढरपूर येथे नवीन शाखा ग्राहकांच्या सेवेसाठी  सुरु झाली आहे. 

                        मनोरमा को-ऑप बँक लि.,सोलापूर या आपल्या बँकेच्या २७ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.आपल्या बँकेचे कार्यक्षेत्र सोलापूर,पुणे,उस्मानाबाद व सांगली जिल्हा आहे.. सोलापूर शहर व जिल्यातील आर्थिक विकासामध्ये योगदान देणारी मनोरमा बँक २६ वर्ष पूर्ण करून २७ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. बँकेच्या कामकाजाला ९ मे १९९७ रोजी अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर ग्राहक सेवेस सुरवात केली. मनोरमा बँकेचे संस्थापक अध्यक्ष क़ै.स.रा.मोरे (दाजी) यांच्या सेवाभावी व अमुल्य मार्गदर्शनाखाली मागील २६  वर्ष परिवाराच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस  वाढता चाललेला दिसून येतो. बँकेने ठेवी, कर्ज वाटप आदी आर्थिक व्यवहारात उल्लेखनीय प्रगती केलेली आहे. आपणा सर्वांच्या सहकार्याने ‘जो जे वांछीले, तो ते लाहो’ या उक्तीप्रमाणे सुरु झालेल्या आपल्या बँकेने मागील २६  वर्षात केलेल्या प्रगती उल्लेखनीय आहे.

LATEST NEWS & EVENTS

मनोरमा बँकेची 27 वी वार्षीक सर्वसाधारण सभा ऊत्साहात पार पङली ..
बँकेला 3 कोटी 5 लाखांचा नफा. यंदा सभासदांसाठी  12% लाभांशाची घोषणा ... !!

सोलापूर - मनोरमा को ऑप बँकेची 27 वी वार्षीक सर्वसाधारण सभा बॅन्केचे चेअरमन श्रीकांत मोरे यांचे आध्यक्षते खाली नविन आर.टी.ओ. ऑफीस जवळील बेनूर नगर मधील मनोरमा हाॅल मध्ये रविवार दि.17 सप्टेबर ला स. 10.30 वा  संपन्न झाली .
मार्च 2023 आखेर  बँकेचे भागभांङवल 12 कोटी 80 लाख ईतके आसून सभासद संख्या - 6101 इतकी आहे. बँकेने मार्च 2023 आखेर 355 कोटीची  कर्जे दिली आहेत. बँकेच्या ठेवी 555 कोटी च्या आहेत तर बँकेच्या सुरक्षीत ठेवी 195  कोटी आहेत .शिवाय बँकेचा मिश्र व्यवसाय 915 कोटीचा आहे. बँकेचे थकित कर्जाचे प्रमाण शुन्य टक्के आसून सलग पाचव्या वर्षी बँकेचा एन.पी. ए . शून्य टक्के राखण्यात संचालक मंङळाला यश मिळाले आहे. यंदा बॅन्केला 3 कोटी पाच लाख ईतका भरघोष  नफा झाला आहे .त्यामुळे मा. संचालक मंङळाने 12 % लाभाश देण्याची घोषणा वार्षीक सभेत केली आहे .त्यास सभासदानी टाळयाच्या गजरात जोरदार समर्थन दिले.
सभेच्या सुरूवातीस मृत सभासद ..राजकीय सामाजीक सांस्कृतीक  क्षेत्रातील मृत व्यक्ती  याना  भावपूर्ण श्रध्दांजली आर्पण करून त्याचे प्रती सदभावना व्यक्त करणेत  आली .
त्यानंतर  प्रथेप्रमाणे जेष्ठ सभासदाच्या शुभहस्ते दिप प्रज्योलन करून सभेच्या विषयवार सुची चे वाचन सी.ई.ओ. सौ. शिल्पा मोहीते- कुलकर्णी यानी केले. प्रत्येक विषया वर . चर्चा होऊन सर्व विषयास सभादानी हात उंचावून  एकमताने मंजुरी दिली. 
  यावेळी सभेपुढे एकूण 11 विषय चर्चे करिता मांङण्यात आले होते बँकेचे कार्यक्षेत्र सोलापूर,पुणे, उस्मानाबाद,  सांगली जिल्हा असे आहे. बँकेच्या सध्या एकूण सात शाखा कार्यान्वीत आहेत . सोलापूर शहरात चार पुणे, पंढरपूर व अक्कलकोट येथे प्रत्येकी एक आशा सात शाखा सुरू आहेत .आगामी काळात बॅन्केची व्याप्ती वाढविण्या करिता जोङबसवण्णा चौक सोलापूर येथे नविन शाखा उभारण्यासाठी आर .बी. आय. कङे  प्रस्ताव सादर करणेस  मंजुरी देण्यात आली .
यावेळी व्हाईस चेअरमन संतोष सुरवसे कार्याध्यक्षा सौ. आस्मिता गायकवाङ संचालक श्री.गणपत कदम ङाॅ. सुमीत मोरे ङाॅ. ऋचा मोरे- पाटील .श्री.दत्ता मामा मुळे .श्री.सुहास भोसले श्री. गजेन्द्र साळुखे .सौ. शुभांगी भोसले श्री.विकास सक्री ङाॅ सत्यजीत वाघचौरे श्री.प्रशांत शहापूरकर श्री.चंद्रकांत खरटमोल श्री.मैनुद्दीन नदाफ .ङाॅ. बब्रुवान रोंगे मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा सौ. शोभा मोरे बोर्ङ ऑफ मॅनेजमेन्टचे अध्यक्ष अॅङ. सुरेश गायकवाङ .यानी विशेष सहभाग नोंदविला .
  यावेळी बँकेचे सभासद व ठेवीदार चंद्रकात माने श्री.कुंभार श्री.काका विधाते . श्री. माधवराव गव्हाने श्री. विश्वासराव मोहीते श्री. मोहोन गायकवाङ श्री. आभिजीत शिंदे श्री. विठ्ठल गरङ यानी देखील चर्चेत सहभाग घेतला .विशेष म्हणजे सभासद श्री. चंद्रकात माने यानी बँकेच्या यशस्वी वाटचालीचा आचूक लेखाजोखा माङून संचालक मंङळ कर्मचारी ठेवीदार व कर्जदार याचे विशेष  कौतुक केले.
यावेळी सर्व सभासदाच्या सुचनाचे मा. चेअरमन श्रीकांत मोरे यानी स्वागत करून बँकेला सभासदांकङून भरभरून  मिळत आसलेल्या पाठिब्याबददल आभार मानले तसेच.बँक यापुढील काळात अधिक दमदारपने वाटचाल करीत राहील .आसे सांगून  भविष्यात साकारीत आसलेल्या अभिनव संकल्पनेची माहीती देखील श्री मोरे यांनी दिली.
   या वार्षीक सभेस सोलापूरचे ङी. ङी. आर .श्री.किरण  गायकवाङ यांची देखील विशेष उपस्थिती होती. श्री. गायकवाङ यानी  बॅन्केच्या व्यवस्थापनाचे विशेष कौतुक करून बॅन्केच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. 
या सभेच्या यशस्वीते करिता अजय मोरे,श्री. करंङे,श्री. पुजारी,महावीर शहा,संतोष धमगुंङे, नयना भोसले, रुपाली काळ॔गे, सुनिल पाटील ,कटारे, पुरूषोत्तम साखरे, दिपक सुरवसे आदी व्यवस्थापकीय कर्मचारी वर्गाने विषेष परिश्रम घेतले .
  यावेळी संपूर्ण सभागृह  सभासदाच्या उपस्थितीने खचाखच भरले होते. शेवटी स्नेहभोजनानी सभेची सांगता झाली.

bottom of page