मनोरमा को ऑप बँक लि सोलापूर - Manorama Coop Bank Ltd Solapur
top of page

ABOUT US

मनोरमा बँकेबद्दल 

मनोरमा बँकेची सुरुवात दि. ०९ मे १९९७ रोजी अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर झाली.

     ‘दाटलेल्या मेघांना आकाश हे न पुरावे.

      कोसळत्या धारांनी धरतीला तुप्त करावे.

                 आज २६ व्या वर्षात पदार्पण करत असताना मनोरमा बँकेच्या नव्हे ‘मनोरमा परिवाराच्या’ वटवृक्षाच्या  विस्तार गगनात मावेनासा असा झाला आहे.

             मनोरमा परिवाराच्या असंख्य सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक , आर्थिक, क्रीडाक्षेत्रातील, साहित्य क्षेत्रातील कामकाजामुळे आपले आगळे-वेगळे स्थान पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झाले आहे.

            ‘ मनोरमा परिवार’ आपले विस्तारणारे क्षितीज घेऊन आता ‘पुणे’ येथे नरपतगिरी चौक, सोमवार पेठेत आपल्या ५ व्या शाखेच्या माध्यमातून पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली.

                 मनोरमा परिवाराची अत्यंत त्रोटेक अशी ओळख करून देत असताना या परिवाराचा दीपस्तंभ संस्थापक चेअरमन -  क़ै. स. रा. मोरे ज्यांनी स्थापनेपासून ते सन २००७ पर्यंत वयाच्या ८१ ते ९३ वर्षापर्यंत बँकेची धुरा संभाळली. अशा नैतिक अधिष्ठान असलेल्या व्यक्तीमुळेच या परिवाराला क्षितीज विस्तारण्याचे बळ मिळाले.

 क़ै. मनोरमा,  क़ै. स. रा. मोरे यांच्या सुविद्य पत्नी ज्यांच्या उर्जेतून  ‘मनोरमा परिवार’ आईच्या प्रेमान सातत्याने पवाहीत आहे.

       ‘                     मनोरमा’  हे एक आईचे नाव ।

                             आईच्या प्रेमात राजकारण नसते.

                             बाळाच्या दुध पाजताना,हातचे राखून नसते.

                             तुमचे आमचे असे असते,तर

                            समाजाचे किती बरे झाले असते।

              ‘जो जे वांछिले तो ते लाहो। ’ हे ब्रीद वाक्य घेऊन    समाजाचे आदर्श जपणे ही शिकवण बँकेचे मार्गदर्शक श्री.श्रीकांत मोरेसो. आणि मनोरमा सखी मंच अध्यक्षा सौ. शोभा श्रीकांत मोरे  यांनी आज पश्चिम महाराष्ट्रात आदर्श श्रेणीत घेऊन बसविले आहे.

        बँकेच्या सर्वांगीण प्रत्येक क्षेत्रात ( No Stone left unturned) श्री.श्रीकांत मोरे व  सौ. शोभा श्रीकांत मोरे  यांनी जे काम मनोरमा परिवाराच्या माध्यमातून चालू ठेवले आहे.

                      त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य महिला, बचत गटाच्या महिला, तळागाळातील कस्टकरी वर्ग आणि माणसे जोडणे हाच मूलमंत्र आहे.

                              मातीला काय विचारता,

                              जात त्याची कोणती ?

                              पाण्याला काय विचारता,

                              रंग त्याचा कोणता ?

                   धर्म- जात- पंथ विरहीत अर्थक्षेत्राचा कोणत्याही रंगाचा झेंडा न घेता केवळ ‘माणुसकी’ या एकाच बिंदूभोवती कार्यरत असणारा परिवार श्री.श्रीकांत मोरे आणि  सौ. शोभा श्रीकांत मोरे  यांनी कार्यरत ठेवला आहे.

       ‘             अर्थकारण’ हे निमित्तमात्र परंतु माणुसकीचा धर्म वाढविणे हे मात्र काय !

                    मनोरमा परिवाराच्या एकूणच कार्यात समाजातल्या सर्व संचालक मंडळीचे, शेकडो कर्मचार्यांचे, बँकेच्या सभासदांचे,हितचिंतकाचे , ग्राहकांचे हजारो हात सदिछेने कामकाजात मग्न आहेत.

                     या सर्व हातांना मनोरमा परिवाराचे प्रणाम !

                     जय हिंद !

                    जय महाराष्ट्र 

बँकेची मागील 6 वर्षाची आर्थिक स्थिती
bottom of page